नाचुन मोठे होऊ नका तर वाचुन मोठे व्हा वाचन करूण जीवनाचा भवितव्य घळवा - सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे
चित्रा न्युज प्रतिनिधी
गोरेगाव - तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे आज दिनांक १४ एप्रिल ला भारतरत्न, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, सदस्य वाय एफ पटले सर, कमलेश पटले,प्रमानंद तिरेले, पोलिस पाटील राजेश येळे, तंन्टामुक्त समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले, सामाजिक कार्यकर्ते शिवराम मोहनकार, मुकेश येरखडे, सेवानिवृत्त शिक्षक आर एफ पारधी सर,लोककल्यान संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र बिसेन, संस्थेचे सदस्य हिरालाल महाजन, चंद्रकुमार चौरागडे, सेवानिवृत्त प्राचार्य डि आर चौरागडे सर, सामाजिक कार्यकर्ते शिवराम मोहनकार,तेजलाल कावडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, न्याय शास्त्रज्ञ , अर्थशास्त्र,राजकारणी आणि समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की नाचुन मोठे होऊ नका तर वाचुन मोठे व्हा जर तुमच्या कडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या व एका नाण्याची पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल असे सांगितले छत्रपती शिवाजी महाराजाचे स्वराज्य आणि त्यांना अभिप्रेत रयत कल्याणाचा विचार न्याय,समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यावर आधारित राज्यघटना निर्माण करणारे,दिनदुबळ्याचे उद्वार करणारे महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत आज अशा महामानवची जयंती साजरी करण्यात येत आहे असे प्रतिपादन सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा चेचाने तर आभार मिनाक्षी चौधरी यांनी मानले यावेळी वाचक विद्यार्थी व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या