यास अधिकाऱ्यांची पाठ म्हणावे कि अधिकाऱ्यांची उदासीनता !
तुषीत गजभिये चित्रा न्युज प्रतिनिधी
पालांदूर (चौरस) : जिल्ह्यात वारंवार शिक्षक मागणी व तक्रारी केली जात असल्याचे मागील दिवसांपासून दिसून येत आहे अश्यात अनेकांनी मोर्चे व आंदोलनही पुढारले मात्र सद्यस्थिती अजूनही सुधारलेली नाही एकीकडे शाळेत पहिल्यावर्गाचे प्रवेश करिता शाळेतील शिक्षक सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे तर अनेक शाळेत अजूनही वर्ग १ते ४ असूनही शिक्षक मात्र एकच आहे अश्यात पालकांची शिक्षक मागणी जोर धरत असली तरीही अजूनही काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत एकच शिक्षक कारभारी दिसून येत आहे त्याचेच उदाहरण किल्लारी पटाची वर्ग १-४एकूण विद्यार्थी ४४ एक शिक्षक एक स्वयसेवक त्यातही स्वय सेवकांचा कालावधी संपण्याच्या मार्गावर, पडसगाव एक शिक्षिका ४३ विद्यार्थी ,विहिरगाव एक शिक्षक ४३ विद्यार्थी , पालांदूर एक शिक्षिका ९२ विद्यार्थी अश्यात अनेकांनी शासकीय आदेशाला अनुसरुन बी एल ओ ची कामे स्वीकारली त्यामुळे एकच शिक्षकावर भार दिल्याने शाळेतील कारभार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणबाबतीत दुरावा अशी परिस्थिती निर्माण झाली असून शालेय शिक्षण संदर्भात जिल्हा परिषद शाळेसाठी विदारक परिस्थिती उद्भवली आहे आणि शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गत शैक्षणिक सत्रात नव्या भरतीतून शिक्षक मिळतील ही आशा बाळगून गावोगावचे लोकप्रतिनिधी प्रतिक्षेत होते एका नियमित शिक्षकासह कंत्राटी स्वयसेवकाच्या जोरावर शैक्षणिक कारभार सुरू होते मात्र ३१ मार्च रोजी कंत्राटी शिक्षकांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकाच शिक्षकावर चारही वर्गाची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून पालकांमध्ये संतापाची भावना वाढू लागली आहे.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल ५०० पदे रिक्त असून लाखनी तालुक्यातच ६० जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका
होत आहे. यामुळे भविष्यात जिल्हा परिषद शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर पालकांना आता शैक्षणिक दर्जा मिळावा या आशेने प्राइवेट शाळेकडे धाव घ्यावी लागत आहे गावातील समस्येबाबत लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले मात्र शिक्षक उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. संदर्भात लाखनीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांच्याकडे चुप्पी साधून असल्याचे म्हटले जात आहे तर बावनकुळे यांनी वरिष्ठ स्तरावर किमान दोन शिक्षकांची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
यंदा पवित्र पोर्टल मधून शिक्षकांचा प्रश मार्गी लागणार काय ?
पवित्र पोर्टल' अंतर्गत मे महिन्यात भरतीची शक्यता असून जिल्ह्यात सुमारे ५०० शिक्षकांची गरज आहे. पवित्र पोर्टल माध्यमाने भरती प्रक्रिया पार पडल्यास दोन नियमित शिक्षक मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षक भरती कडेही ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष वेधून आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता व पालकवर्ग जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे हे डाव साधले जात असल्याचे मत व्यक्त करीत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळाना आता सुरळीत ठेवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करून व शासनाने शाळेव्यतिरिक्त कामे शिक्षकावर न लादता शिक्षणावर भर देणे गरजेचे झाले आहे.
शिक्षक अभावी विद्यार्थ्याची होतेय शैक्षणिक नुकसान - जबाबदार कोण ?
लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था होत असल्याचे सुजान पालकांनी स्पष्ट केले शाळेत एकच शिक्षक असताना बी एल ओ ची कामे दिल्याने शाळेचे शिक्षक सध्या बी एल ओ ची कामे करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शाळेची व विद्यार्थ्याची जबाबदारी सोबतच त्यांना इतर कामे करावी लागत आहेत यास जबाबदार कोण ? असा संतृप्त सवाल उपस्थित होत आहे.


0 टिप्पण्या