Ticker

6/recent/ticker-posts

एकोडी क्षेत्रात रब्बी धान पिकासाठी अखंडीत वीज पुरवठा करा

वीज वितरण कंपनीला निवेदन 

साकोली :-तालुक्यातील एकोडी  परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी/उन्हाळी धान पिकासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कार्यालय एकोडी येथे निवेदन देण्यात आले. निवेदनात  सध्या धान पिकासाठी वीजपुरवठा अपुरा व अनियमित मिळत असून, वारंवार लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत व उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे तात्काळ लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनात नमूद केलेल्या समस्या लवकर न सोडवल्यास तीव्र  शेतकरी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
निवेदन देतांना एकोडीचे सरपंच संजय खोब्रागडे, संजय समरीत, चांदोरीचे सरपंच विठ्ठल मसराम, एकोडी ग्रामपंचायतचे सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड तसेच शेतकरी कार्तिक मेश्राम, योगराज भुरे, संदिप मेश्राम, राकेश काळसर्पे, दिलीप कापगते, अशोक भुरे  ध्यक्ष त.मु.स, संजय कापगते, संदिप भुरे, चंद्रशेखर कापगते, दीपक कापगते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या