Ticker

6/recent/ticker-posts

भंडाऱ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; प्रशासनाची कामे ठप्प

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत विस्तृत अधिसूचना जाहीर करावी तसेच इतर प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या आवाहनानुसार भंडारा येथे बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे.
त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे श्री रामभाऊ येवले (निमंत्रक, समन्वय समिती, भंडारा) यांच्या नेतृत्वात दि. 21 एप्रिल 2026 पासून हा संप सुरू झाला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील एकूण 18 संघटनांचे सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सदर संपामुळे महसूल, कोषागार तसेच सामान्य रुग्णालयातील कामकाज पूर्णतः ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या