चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली : माओवादविरोधी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापुर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
नीलोत्पल यांनी आपल्या कार्यकाळात माओवाद्यांविरोधात अनेक यशस्वी अभियान राबवले. भूपतीसह अनेक कुख्यात माओवादी नेत्यांना शरण आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. शांत, संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कारवाई यामुळे त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले एम. रमेश यांनीही माओवादविरोधी कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीही गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी लढा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नीलोत्पल यांची कारकीर्द गडचिरोलीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या कार्याची नोंद विशेषत्वाने घेतली जाईल, असे मत व्यक्त केले जात आहे.


0 टिप्पण्या