Ticker

6/recent/ticker-posts

साकोली-सेंदुरवाफा नगर परिषद अंतर्गत विकासकामांवर महत्त्वपूर्ण चर्चा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-साकोली-सेंदुरवाफा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक तथा गटनेते इंजि. संदीपभाऊ बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद चुऱ्हे साहेब यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत नगर परिषद हद्दीतून जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक प्रलंबित विषयांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या बैठकी दरम्यान इंजि. संदीपभाऊ बावनकुळे यांनी सेंदुरवाफा आणि साकोली परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधले.
नगर परिषद सेंदुरवाफा व साकोली अंतर्गत ज्या रस्त्यांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे अशा खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व सिमेंटीकरण करणे. पावसाळापूर्व नियोजन तसेच नागरिकांची सुरक्षा व दळणवळण रहिवासी भागातील धोकादायक वळणे. रस्ते रुंदीकरण आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणाऱ्या कामांना प्राधान्य देणे. या प्रसंगी इंजि. संदीपभाऊ बावनकुळे यांच्यासोबत नगरसेवक इंजि. कुणाल राऊत, नगरसेविका वैशालीताई लांजेवार, त्रिवेणीताई चौधरी, स्मिता सिडाम, डॉ. सायली दोनोडे आणि निर्मलाताई नंदेश्वर प्रामुख्याने उपस्थित होत्या. ---------------------------------------------

 
साकोली आणि सेंदुरवाफा नगर परिषद हद्दीतील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अनेक कामांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. कार्यकारी अभियंता चुऱ्हे साहेब यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. आमच्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या सोबतीने ही प्रलंबित कामे आम्ही लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत.
इंजि. संदीपभाऊ बावनकुळे.
 (नगरसेवक तथा गटनेता)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या