Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांचा " बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : मोहाडी तालुक्यातील शितेपार येथील सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र श्रावण गजभिये यांच्या मातोश्री बुद्ध वाशी अनुसया श्रावण गजभिये यांचे बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी दुखद निधन झाले. त्यानिमित्ताने पुण्यानु मोदन  कार्यक्रम दिनांक शुक्रवार 22 मे 2026 रोजी सायंकाळी 9 ते 12 पर्यंत बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला : रामटेक तालुक्यातील किरणापुर  येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज,प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे आणि त्यांच्या संच शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत  बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमाला भारत नागोसे तबला वादक, दिलीप शेलोकर नाल वादक, रवी उरकुडे बँजो वादक, तुषार नागोसे प्याड वादक, गायिका नीलकमल गोंडाने, वैभवी बनसोड, ओमप्रकाश गजभिये, विलास गजभिये, मुकेश गजभिये, प्रमोद बागडे, जितेंद्र भोयर, सुचित्रा गजभिये, खुशी भोयर, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते  - जयेंद्र गजभिये, सामाजिक कार्यकर्ते आनंद भोयर, समस्त समाज बांधव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या