Ticker

6/recent/ticker-posts

नेहरू नगर भोजापूर येथे बुद्ध जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम समारोह

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-नेहरू नगर भोजापूर येथे लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर च्या वतीने महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
        कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, मेणबत्ती प्रज्वलित करून, अभिवादन  करण्यात आले. अनिता तिरपुडे, रुपलता गणविर, चंदा लांजेवार, वर्षा गणविर, कल्पना नागवंशी, केशर गणविर व सुजाता गोस्वामी यांनी सहभाग घेतला. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. 
       यावेळी बोधी वृक्षांचे संवर्धनाचा संदेश देत विधीवत पूजा करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व तसेच भीम-बुद्ध गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्नेहांश कान्हेकर, अंश बोरकर व ओवी मेश्राम यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
         कार्यक्रमास संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम, से.नि. प्राचार्य नरेंद्र गणविर, प्रा.डॉ. विजय गणविर, प्रा.डॉ. महेश भैसारे, नंदकिशोर भालाधरे, देवेंद्र धारगावे, नितेश धारगावे, प्रा.डॉ. पुण्यशिल टेंभू्णे, राखी रंगारी, शिला मेश्राम, दुर्गाप्रसाद सुर्यवंशी, मृणाली कान्हेकर, नागसेन लांजेवार, प्रदिप गणविर, राजेंद्र तिरपुडे, महादेव मून, धर्मदास उके, सुरेश शेंडे, जोगेंद्र मेश्राम, सुबोध मेश्राम, देविदास माटे, विनोद हुमणे, भारत नंदागवळी, निकेश सुखदेवे, आनंद नागदेवे, नरेंद्रसिंग नागवंशी, अस्मिता धारगावे, राहूल दहीवले, दिपक मेश्राम, प्रमोदिनी भालाधरे, सपना मेश्राम, लिना टेंभुर्णे, मार्कंड मेश्राम, दिपक मेश्राम, सुबोध मेश्राम, ज्योत्सना मेश्राम, जोगेंद्र मेश्राम, क्षितिजा गोस्वामी, निसर्गा गोस्वामी, रूतुजा गणविर, अदिती धारगावे आदी मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश मेश्राम, राहुल रामटेके व आदित्य गणविर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र गणविर यांनी केले. सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या