Ticker

6/recent/ticker-posts

कडेगावात लाल वादळ! महाराष्ट्र राज्य किसान सभेचे तीन दिवसीय राज्य स्तरीय अभ्यास शिबीर संपन्न

शेतमाल भाव, वनजमीन, पीक विमा ते शिवराय-फुले यांच्या कृषी दृष्टीकोनावर मंथन;

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंंद्रपूर : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नुकतेच तीन दिवसीय राज्य स्तरीय अभ्यास शिबीर आनंदराज मल्टीपर्पज हॉल, कराड रोड कडेगाव येथे थाटामाटात संपन्न झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिल्हा-जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन कॉ. ऍड. सुभाष लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. राजन क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा नवी दिल्ली होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून कॉ. वैभव काका पवार, किसान नेते यांनी जबाबदारी सांभाळली.
प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. ऍड. हिरालाल परदेशी, राज्य अध्यक्ष, कॉ. अशोक सोनारकर, राज्य महासचिव अमरावती आणि कॉ. डॉ. महेश कोपुलवार, राज्य कार्याध्यक्ष गडचिरोली उपस्थित होते. 

उद्घाटनापूर्वी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. शहरभर लाल झेंडे, तोरण, पताके, गेट सजावट करण्यात आली होती. रॅलीनंतर भव्य सभा, लाल झेंडा फडकावून झेंडा वंदन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन झाले.

तीन सत्रांत महत्त्वाच्या विषयांवर मंथन:

पहिले सत्र: 1.डॉ. स्वामीनाथन आयोग, MSP व शेतकरी लढा - वक्ते: कॉ. अशोक सोनारकर  2. वनजमिनीचे प्रश्न - फायदे व वास्तव - वक्ते: ऍड. कॉ. हिरालाल परदेशी 3. पीक विमा, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2025, दुष्काळ, अल निनो - वक्ते: कॉ. राजन क्षीरसागर

दुसरे सत्र:1. मार्क्सवादी दृष्टीकोन व शेतकरी आंदोलन - कॉ. राजन क्षीरसागर 2. संत-वारकरी संप्रदाय व ग्रामीण संस्कृतीत किसान सभेची वाटचाल - कॉ. तानाजी ठोंबरे 3. शिवराय-शाहू-महात्मा फुले यांचा कृषी विषयक दृष्टीकोन - कॉ. स्मिता पानसरे 4. भूसंपादन, विस्थापन, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन - कॉ. गिरीश फोंडे 5.कृषी पत पुरवठा, कर्जमुक्ती, बँकांची भूमिका* - कॉ. राजन क्षीरसागर  
6.कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान - कॉ. लता भिसे  

तिसरे सत्र: संघटनेचे महत्त्व, किसान सभेची रचना व शाखांचे महत्त्व - वक्ते: कॉ. डॉ. महेश कोपुलवार त्यानंतर राज्य कौन्सिल सभा व समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या शिबिरात चंद्रपूर जिल्ह्यातून कॉ. राजू गैनवार, माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भाकप, कॉ. प्रा. नामदेव कन्नाके, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा, कॉ. वंदना गैनवार, कॉ. रवींद्र उमाठे, जिल्हा सचिव भाकप, कॉ. प्रकाश रेड्डी, किसान सभा नेते इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.

------------------------------------------
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लाल बावट्याखाली पुन्हा एकदा मंथन झालं. सांगलीच्या कडेगावात महाराष्ट्र राज्य किसान सभेचं तीन दिवसीय राज्य स्तरीय अभ्यास शिबीर पार पडलं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींपासून ते शिवरायांच्या कृषी धोरणापर्यंत सर्व विषयांवर चर्चा झाली. कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यासह राज्यातील बड्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं..."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या