Ticker

6/recent/ticker-posts

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती भ्रष्टाचार प्रकरण: राहुल ससाने यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी 'सम्यक'चे निवेदन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणारे राहुल ससाने यांनी विद्यापीठात होणारा प्राध्यापक भरतीचा भ्रष्टाचार बाहेर काढून मीडियासमोर मांडला होता. याच्या विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ मे २०२६ रोजी त्यांच्या विरोधात एक प्रकटन जारी केले. 

सदर प्रकटनामध्ये विद्यापीठाची अब्रू नुकसानी झाल्याचा आरोप ठोकत, राहुल ससाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे नमूद केले आहे. 

विद्यापीठाच्या या भूमिकेच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराकडून राहुलजी यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, असे निवेदन देण्यात आले आहे. 

या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराचे उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, युवा आघाडी सचिव किरण सैंदाणे आणि अनिल धनगर हे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या