Ticker

6/recent/ticker-posts

RTO ई-चलानच्या नावाने भद्रावतीत 1.94 लाखांचा गंडा: APK फाईलने व्हॉट्स ॲप हॅक करून बँक खाते साफ

इंदिरा नगरातील युवकाला भुर्दंड; सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल, नागरिकांनो सावधान


चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती:आरटीओ ई-चलानच्या नावाने आलेल्या बनावट व्हॉट्स ॲप मेसेजमुळे भद्रावती येथील एका युवकाला तब्बल 1 लाख 94 हजार 700 रुपयांचा गंडा बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. APK फाईल डाउनलोड करताच युवकाचे व्हॉट्स ॲप हॅक होऊन त्याच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले.

इम्रान खान, वय 34, रा. इंदिरा नगर, भद्रावती यांना 13 मे रोजी व्हॉट्स ॲपवर ई-चलान संदर्भातील मेसेज आला. त्या मेसेजमध्ये एक APK फाईल पाठविण्यात आली होती. ई-चलान पाहण्याच्या हेतूने इम्रान खान यांनी ती फाईल डाउनलोड करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला.

त्यानंतर त्यांच्या व्हॉट्स ॲपवरून आपोआप मेसेज पाठविले जाऊ लागले. तसेच त्यांच्या HDFC बँक खात्यातून IMPS द्वारे 1 लाख 90 हजार रुपये आणि 4 हजार 700 रुपये असे दोन व्यवहार करून एकूण 1 लाख 94 हजार 700 रुपये बँक ऑफ बडोदाच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इम्रान खान यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेलकडून सुरू आहे.

*नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना:*  
1.RTO, वीज बिल, किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून APK फाईल येत नाही. 
2.  अनोळखी लिंक किंवा फाईलवर क्लिक करू नका.
3.  ई-चलान तपासण्यासाठी केवळ  या अधिकृत वेबसाईटचाच वापर करा.
4.  व्हॉट्स ॲपवर Two-Step Verification सुरू ठेवा.

-------------------------------------- 
          ----------------बाक्स-----------
सावधान भद्रावतीकर! RTO चलानच्या नावाने आलेल्या APK फाईलमुळे इंदिरा नगरातील युवकाचे 1.94 लाख लंपास. व्हॉट्स ॲप हॅक करून बँक खाते केले रिकामे. अनोळखी लिंक उघडू नका. ही बातमी शेअर करून इतरांना सावध करा

--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या