Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड : कंधार तालुक्यातील चिखली गावातील अनेक मराठा युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस हातभार लावला. हा प्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन आणि प्रा. राज आटकोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मराठा समाजातील युवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये ज्ञानेश्वर कदम, किशन पारडे, नागेश ढेबरे, राहुल पारडे, अभिजीत पोटफोडे, नागेश पारडे, प्रवीण पारडे यांच्यासह अनेक युवकांचा समावेश होता.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, महासचिव रवि पंडित, महासचिव दीपक मगर, अरुण भद्रे, संजय टीके, रंगनाथ गजले, राम वनंजे, गणपत सवाई, सन कांबळे, विद्यानंद पवळे, ॲड. जयपाल ढवळे, प्रकाश कोल्हे, के.एच. वने, धाराजी इंगोले, राणा प्रताप पवळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या