चित्रा न्यूज प्रतिनिधी,
भंडारा :-भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी गणेश घनश्याम लिमजे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे नागपूर व संपूर्ण विदर्भ विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.
काँग्रेस विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद खलील सैफ
यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. नियुक्तीनंतर श्री. लिमजे यांनी पदभार स्वीकारला असून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटन मजबूत करणे आणि विदर्भातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे यावर भर देणार असल्याचे सांगितले जाते.
गणेश लिमजे यांच्या निवडीमुळे भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
"पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करू," अशी भावना गणेश लिमजे यांनी व्यक्त केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.


0 टिप्पण्या