LCB चा घरावर छापा, 620 ग्रॅम गांजासह 23 वर्षीय चेतन पोईनकर अटकेत; साथीदार 'खवलू' फरार
मोबाईलसह 16 हजारांचा मुद्देमाल जप्त; NDPS अंतर्गत गुन्हा, ईशांत मानकरचा शोध सुरू
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती: शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. गुरूनगर परिसरातील आरोपीच्या राहत्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल 620 ग्रॅम गांजा आणि मोबाईलसह 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुनगरात सापळा रचून छापा टाकला. यावेळी *
गुरूदास उर्फ चेतन भास्कर पोईनकर (वय 23) याच्या घरातून गांजा विक्रीसाठी साठवलेला असल्याचे उघड झाले. आरोपी पान टपरीवर काम करत असताना मागील काही दिवसांपासून गुप्तपणे गांजाची विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 6,000 रुपये किमतीचा गांजा आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात हा गांजा त्याचा साथीदार ईशांत उर्फ खवलू मानकर याच्यासोबत संगनमत करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS Act 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला भद्रावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करत आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि भद्रावती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात पार पडली.
सपोनि दिपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार स्वामी चालेकर, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, किशोर वैरागडे, अजय बागेसर, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, महिला पोलीस अंमलदार पुजा पंधरे, चालक दिनेश अराडे व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे कर्मचारी सहभागी होते.
____________________________________
भद्रावती: पान टपरीवाला निघाला गांजा विक्रेता!
भद्रावतीच्या गुरुनगरात LCB चा छापा. 23 वर्षीय चेतन पोईनकरच्या घरातून 620 ग्राम गांजा व मोबाईलसह 16 हजारांचा माल जप्त आरोपी कटकेत. साथीदार खवलू मानकर फरार.पान पानटपरीच्या आडून चालवायचा धंदा.


0 टिप्पण्या