चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भद्रावती मोहरम बहूउद्देशीय उत्सव समिती ( सर्वधर्म समभाव ) तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोहरम च्या दहावीला ला सायंकाळी 5 ते रात्रौ 10 वाजे पर्यंत गांधी चौक भद्रावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गांधी चौक येथे संपूर्ण चौकात लायटिंग - रोषणाई - पताका - स्वागत गेट - ढोल ताशे इत्यादिनी सजावट करण्यात आले यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक दर्शनासाठी आले होते
पूजा अर्च्या प्रफुल चटकी नगराध्यक्ष नगर परिषद भद्रावती - योगेश्वर पारधी ठाणेदार पोलीस स्टेशन भद्रावती - राजू गैनवार समितीचे सचिव व माजी नगरसेवक - यांच्या हस्ते करण्यात आले
प्रमुख पाहुणे म्हणून अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष - ऍड सुनिल नमोजवार नगरसेवक - उमेश रामटेके माजी नगरसेवक - -निलेश पाटील माजी नगरसेवक - रब्बानी शेख सामाजिक कार्यकर्ता इत्यादी उपस्थित होते
सर्व उपस्थितीस्थानचे गुलदस्था देऊन समिती तर्फे सत्कार व स्वागत करण्यात आले
पाहून्याच्या हस्ते सलाम दुवा करून फात्या दारुद करण्यात आले
अनेक सामाजिक संघटने तर्फे शरबत - लंगर - मिठाई - प्रसाद - मासाला भात व पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले या मध्ये व्यापारी असोसिएशन - ऍटो असोसिएशन - भद्रावती पत्रकार असोसिएशन व इतर सामाजिक संघटना सहभागी झाले होते भद्रावती तालुक्यातून शहरातून व प्रत्येक वार्डा - वार्डातून सवऱ्या - ख्वाजा - ताजे - पंजे - डोले गांधी चौकात एकत्र येऊन भेटीगाटी घेतल्या व याला जत्रेचे स्वरूप आले होते गेल्या वीस वर्षा पासून सदभावना - भाईचारा -
कोमी एकता - देशभक्ती - शांतता कायम ठेवण्याचे कार्यक्रम समिती मार्फत करण्यात येत आहे मोहरमची पहिली ला मोहरम ची सुरवात होते व मोहरमच्या चवथी ला व मोहरम च्या पाचवी ला सवऱ्यांची स्थापना झाले होत्या व मोहरमच्या सातवी व नववी ला रात्रौ सवऱ्या व खाजा हे प्रत्येक दरग्यावर भेटी गाटी घेत असतात आणि मोहरमच्या दहावी ला मोहरम ची सांगता गांधी चौक करण्यात आली
या कार्यक्रमात स्त्री - पुरुष दोन ते तीन हजार भाविक भक्तगण व बाहेर गावातील लोक दर्शनाकरिता उपस्थित झाले होते
कार्यक्रम यशस्वी करणे करिता
जावेद शेख - सागर
जट्टलवार - प्रशांत बदखल - जगन दानव -खेमचंद हरियानी - विलास गुंडावार - संजय बॅनर्जी - मनोज बोरसरे - संजय सिडाम - गौरव नागपुरे नगरसेवक - मंगेश सोनुलकर बांधकाम सभापती - महेश जिवतोडे माजी नगरसेवक - पप्पू सारवन माजी नगरसेवक - ऍड प्रमोद गेडाम माजी नगरसेवक - राजू सारंगधार माजी नगरसेवक इत्यादीनी अथक परिश्रम घेतले


0 टिप्पण्या