चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला जगातील 177 देशांनी पाठिंबा दिला त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर 2014 रोजी अधिकृत घोषणा करून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला.
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोदजी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग दिनाचे औचित्य साधून योग, प्राणायामाबद्दल जागरूकता वाढावी तसेच प्रत्येकाने योग साधनेचा आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी स्वीकार करावा असे मत वैद्यकीय अधीक्षक प्रमोदजी पोतदर यांनी केले यावेळी योगा शिक्षक म्हणून बंटी नागले संस्कृती उईके यांनी योगासने करून कर्मचाऱ्याकडून योगासने करून घेतली
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त हजर राहून आपली उपस्थिती दर्शवली.


0 टिप्पण्या