Ticker

6/recent/ticker-posts

जनतेच्या मनातील आमदार अखेर विधान परिषदेत अवतरले

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 

साकोली: साकोली विधानसभा मतदारसंघात अवघ्या २०८ मतांनी पराभव झालेले अविनाश ब्राह्मणकर अखेर विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे जनतेच्या मनातील आमदार म्हणून साकोली विधानसभा क्षेत्रात पुन्हा चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे साकोली विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर नाना पटोले आमदार म्हणून निवडून आले तरीसुद्धा जनतेच्या मनातील आमदार म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांचे फलक साकोली विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी झळकलेले होते. २०८ मतांनी अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव झाला असला तरी जनतेच्या मनातील आमदार म्हणून नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केलेले होते. साकोली तालुक्यातील मूळ सालेबर्डी येथील रहिवासी असलेले अविनाश ब्राह्मणकर यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर काही काळ ते राष्ट्रवादी पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. दरम्यानच्या काळात ते विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. त्यांचा २०८ मताने आमदार नाना पटोले यांच्याकडून पराभव झालेला होता. मात्र आता महायुतीकडून ते विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मागील विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले हे हजारोच्या मताधिक्याने निवडून येतील असे अंदाज वर्तविण्यात आलेले होता. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत रंगतदार ठरलेल्या मतमोजणीत नाना पटोले केवळ २०८ मतांनी विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाना पटोले यांनी बाजी मारली होती. मात्र साकोली विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे जनतेच्या मनातील आमदार असे आशयाचे बॅनर ठीक ठिकाणी झळकलेले होते. त्यामुळे साकोली विधानसभा मतदार संघातल्या या बॅनरची खमंग चर्चा रंगली होती. निवडणूक निकालात २०८ मताचे अंतर असल्याने महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांची जनतेच्या मनामध्ये आमदार म्हणून छबी निर्माण झालेली होती. त्यामुळे तत्कालीन वेळी अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव जरी झालेला असला तरी त्यांच्या चाहत्यांनी जनतेच्या मनातील आमदार अशी अशी बॅनर साकोली विधानसभा क्षेत्र लावलेली होती हे विशेष. त्यामुळे हे बॅनर त्यावेळी साकोली विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरलेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या