(जागतिक योग दिन साजरा)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-योग भारती बहुउद्देशीय संस्था, भंडारा व अविशा (इंटरप्रायझेस) पतंजली चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन २१ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शिवअर्पण टॉवर हॉल येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आशुभाऊ गोंडाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमास गौ अनुसंधान केंद्र, देवलापारचे कोषाध्यक्ष श्री संजय एकापुरे, नगरसेवक मंगेश वंजारी, सनदी लेखापाल श्री पंकज मुंधडा, न.प. सभापती श्रीमती प्रीती गाढवे, युवा कंत्राटदार श्री रुपेश टांगले, अविशा इंटरप्रायझेसचे संचालक श्री पियुष कुरंजेकर, डॉ. रेणुका तिवारी (पतंजली चिकित्सालय), योगतज्ज्ञ श्रीमती चांदनी मुंधडा, नगरसेविका श्रीमती शुभांगीताई खोब्रागडे, ग्रीन हेरिटेजचे अध्यक्ष सईदभाई शेख,गायत्री परिवारचे श्री राजीव शक्करवार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे वृक्ष रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख योग शिक्षक व योग भारती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री शाम कुकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पतंजली योग समिती (मिस्किन टँक) गार्डनच्या माध्यमातून मागील १२ वर्षांपासून जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. यंदाही १६ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रोटोकॉलनुसार अष्टांग योग, मुद्रा-बांध, अॅक्यूप्रेशर, निसर्गोपचार,षटकर्म क्रिया, सूर्यनमस्कार आदी विषयांवर मोठ्या संख्येने योग साधकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणाचा अनेक साधक-साधिकांनी लाभ घेतला असून आज त्याचा यशस्वी समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आशु गोंडाणे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत, “दररोज थोडा वेळ काढून योगाचा अवलंब केल्यास मानसिक शांतता व शरीर सुदृढ राहते,” असे प्रतिपादन केले. तसेच योग समितीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रमुख अतिथी सर्वश्री संजय एकापुरे, मंगेश वंजारी, पंकज मुंधडा, प्रीती गाढवे,चांदनी मुंधडा, सईदभाई शेख,शुभांगी खोब्रागडे, पियुष कुरंजेकर,रुपेश टांगले,डॉ. रेणुका तिवारी आदींनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री अतुल वर्मा यांनी केले तर आभार डॉ. रेणुका तिवारी यांनी मानले.मोठ्या संख्येने योग साधक व साधिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चिंधुजी बुधे, प्रभुदास मडावी, संजय मोहतुरे,आत्माराम बेदरकर,पुरुषोत्तम साकुरे, पुरुषोत्तम वैद्य,अविशा इंटरप्रायझेस, पतंजली चिकित्सालय आदींनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या