Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ ला असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत .

छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ ला असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत .

छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहू । राजाच्या रूपात ।
जन्मले ग्रामात । कागलात ।।१।।

शाहुंचे संस्थान । एक कोल्हापूर ।
कार्य सर्वदूर । भारतात ।।२।।

पेटवून दिली । प्रकाशाची वात ।
तिमिराची रात । संपविली ।।३।।

बोले तैसा चाले । कर्ते सुधारक ।
प्रजेचे नायक । कर्मांनीच ।।४।।

छत्रपती शाहू । आरक्षण दाते ।
पहिलेच नेते । भारतात ।।५।।

कोल्हापूर क्षेत्री । मुक्त केले जन ।
अस्पृश्यतेतून । शाहू राजे ।।६।।

राजे बहुजन । सर्वांना शिक्षण ।
बोर्डिंग स्थापन । संस्थानात ।।७।।

शाहुंच्या कार्याला । करितो नमन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ।।८।।
      
      राज्यस्तरीय संत कबीर   
      कवीराज पुरस्कार प्राप्त 
               अभंगकार
     प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
    अमरावती : ८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या