Ticker

6/recent/ticker-posts

पैसे मागितल्याने साळ्याचा मेहुण्यावर जीवघेणा हल्ला!

भद्रावतीतील वाढता शहरीकरण झाडे परिसरातील घटना; तातडीने गुन्हा दाखल, आरोपी फरार

राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती: उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून साळ्याने आपल्याच मेहुण्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी 29 जून रोजी दुपारी 3 वाजता वाढता शहरीकरण झाडे परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी साळ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी संजय नामदेव लांबट वय 39, रा. बुट्टिबोरी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा साळा  दुर्वेश आण्याजी महातळे वय 40, रा. झाडे प्लॉट, भद्रावती याला घरगुती कामासाठी काही रक्कम उसने दिली होती. मात्र, बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही दुधेशने पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता.

सोमवारी दुपारी संजय लांबट हे दुधेशच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले होते. पैशांच्या देण्याघेण्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. संतापलेल्या दुधेशने महातळे याने घरात असलेली काही अणकुचीदार लाकूड यान हातापायावर जबर प्रहार केले. या हल्ल्यात लांबट गंभीर जखमी झाले.
  
या प्रकरणी तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
_____________________________________

💸 पैसे मागितले म्हणून मेहुण्यावर काठीने हल्ला!

भद्रावती झाडे प्लॉटो परिसरात उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून साळा दुधेश आण्याजी महातळे याने मेहुणा संजय लांबट याच्यावर लाकडाने प्रहार केला. संजय गंभीर जखमी. आरोपीविरुद्ध भद्रावती पोलिसात BNS कलम 118 नुसार गुन्हा दाखल, आरोपी फरार. कौटुंबिक वाद टोकाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या