Ticker

6/recent/ticker-posts

लाखोरी येथील पीएमश्री जि. प. शाळेत ‘बाल ग्रामपंचायतची’ स्थापना


शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मिळाली लोकशाहीची शिदोरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी श.प्र. : तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा लाखोरी येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची ‘बाल ग्रामपंचायत’ स्थापन करून लोकशाही शिक्षणाचा अनोखा पायंडा पाडण्यात आला. वर्गातील फळ्यापासून थेट पंचायतीच्या कारभारापर्यंत मुलांना नेणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे.शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेत इयत्ता ७ वीचा विद्यार्थी मोहीत राजेश वाघाये याची ‘बाल सरपंच’ म्हणून निवड झाली. हेमंत दिनेश मेश्राम याने ‘बाल उपसरपंच पदाची धुरा सांभाळली. यथार्थ अनमोल रामटेके याची शासकीय सदस्य तसेच बाल सचिव श्रेया आशिष भोयर,वंश संदिप इस्कापे सदस्य, प्रथमेश योगराज तितिरमारे सदस्य, दिव्या गंगाधर भोयर सदस्य,लावण्या मंगेश बोरकर,सदस्य, आर्या संदिप चेटूले सदस्य, पूर्वा चैतन्यश्वर चवळे सदस्य,श्रुषा रंजित इस्कापे सदस्य म्हणून निवड झाली.“केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना प्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे,” असे मुख्याध्यापकांनी सांगितले. ही बाल ग्रामपंचायत दरमहा सभा घेऊन शाळेतील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, वृक्षारोपण, मुलींचे शिक्षण व व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर काम करणार आहे.ग्रामपंचायत लाखोरीनेही या उपक्रमाला पाठिंबा दिला असून महिन्यातून एकदा बाल सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायतीच्या सभेत उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे गावच्या कारभाराची प्रत्यक्ष माहिती मुलांना मिळेल.शाळा सुरू होताच मिळालेल्या या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पालकांनीही शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आहे.निवड प्रकियावेळी लाखोरी ग्रामपंचायत चे सरपंच सुधीर चेटूले, उपसरपंच दिवाकर बांते, सदस्य विलास बांते, सदस्य मनोज रामटेके तसेच महिला सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवड प्रकिया यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विलास बांते मोठे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या