Ticker

6/recent/ticker-posts

प्रेरणादायी आणि उल्लेखनीय यशाची प्रतीक: डॉ. नमीरा सिद्दीकी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर प्रत्येक ध्येय गाठता येते, हे भंडाराची लाडकी डॉ. नमीरा मोहम्मद गालिब सिद्दीकी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नीट एमडीएस परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी ऐतिहासिक यश संपादन केले असून, त्यांचे हे यश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. मुली आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून स्वतःचे, आपल्या आई-वडिलांचे आणि देशाचे नाव नेहमीच उज्ज्वल करत राहोत, हीच अपेक्षा. या अभूतपूर्व यशाबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे.

डॉ. नमीरा सिद्दीकी यांचे ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनच्या वतीने संस्थाध्यक्ष मोहम्मद सईद शेख आणि लियाकत खान यांनी त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या