चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- परिवहन मंत्री आणि नव्याने रुजू झालेल्या आय. पी. एस. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दिलेल्या निदेशानुसार विभागीय पातळीवर सुरक्षा व दक्षता अधिकारी विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक ह्यांच्या पुढाकारणे रा. प. च्या २०० मीटर परिसरातून कोणतेही खाजगी वाहने वाहतूक करणार नाही. दि ५ जून ते दि १५ जून या कालावधीमध्ये मोहीम राबविण्यात येत आहे. सदर कालावधीमध्ये खाजगी वाहने बसस्थानक परिसरातून वाहतूक करतांना आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे. रा प भंडारा विभागा अंतर्गत भंडारा, पवनी, साकोली, लाखनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर, मो. अर्जुनी, देवरी, गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि गोरेगाव हे सर्व बसस्टॅंन्ड असून सदर मोहीम सर्व बसस्टॅन्ड वर राबविण्यात येणार आहे.
मा उच्च न्यायालय औरंगाबाद व नागपूर खांडपीठ यांनी अवैध प्रवाशी वाहतुकीबाबत दिलेल्या निकालात राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या २०० मिटर परिसरातील क्षेत्र खाजगी वाहतूकदारासाठी निषेध क्षेत्र म्हणून जाहीर केले असताना मोठया प्रमाणात सदर आदेशाचे उललंघन होतं असते. त्यामुळे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनी महाराष्ट्रात सर्व विभागीय पातळीवर सदर मोहीम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहे.


0 टिप्पण्या