Ticker

6/recent/ticker-posts

NDPS प्रकरणातील मुख्य आरोपी 'टिपू' पालीतून अटकेत; आंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश


भद्रावती पोलिसांची राजस्थानात धडक!

जमघट हॉटेलसमोरील कारवाईनंतर भद्रावती पोलिसांचे पथक 1000 किमी दूर; आकिब जावेद खानच्या मुसक्या आवळल्या


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती: गुंगीकारक औषधीद्रव्य प्रकरणात भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई करत राजस्थानातून मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या आंतरराज्यीय साखळीचा मोठा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे.
  
पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक 632/2026 अंतर्गत गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 8(क), 22(क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 03 जून 2026 रोजी भद्रावती येथील जमघट हॉटेल समोर मध्यरात्री 00:40 ते 02:15 या वेळेत ही घटना घडली. त्यानंतर सकाळी 05:55 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

फिर्यादी विनोद गजानन भुरले (वय 40, व्यवसाय नोकरी, रा. चंद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमघट हॉटेल परिसरात काही इसमांकडून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींकडून अंमली पदार्थ बाळगणे व विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास सपोनी संजय रा. मिश्रा करीत आहेत.

तपासादरम्यान अटक आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार याच्या चौकशीतून व तांत्रिक विश्लेषणातून आकिब जावेद उर्फ टिपू सलीम जावेद खान (वय 30, रा. वार्ड क्र. 02, हॉस्पिटल रोड, मारवार जंक्शन, जि. पाली, राजस्थान) याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.

यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांचे पथक राजस्थान राज्यात रवाना झाले. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने सखोल शोधमोहीम राबवून दि. 19 जून 2026 रोजी सकाळी 08:20 वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोउपनि संतोष केदार, पोहवा संतोष येलपुरवार (2535), जयसिंह (2138) तसेच पोशि प्रेमकुमार (816) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

___________________________
_*भद्रावती पोलिसांची राजस्थानात मुसंडी!*_  

*NDPS प्रकरणातील मुख्य आरोपी आकिब जावेद उर्फ 'टिपू' खानला पाली जिल्ह्यातील मारवार जंक्शन येथून अटक. जमघट हॉटेलसमोरील कारवाईनंतर तांत्रिक तपासातून धागेदोरे मिळाले. भद्रावती पोलिसांनी 1000 किमी प्रवास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आंतरराज्यीय ड्रग्स रॅकेट उघड.*


*राजस्थानातील पाली येथून अटक केलेला मुख्य आरोपी आकिब जावेद उर्फ टिपू खान भद्रावती पोलिसांच्या ताब्यात. NDPS प्रकरणात मोठी कारवाई*
-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या