Ticker

6/recent/ticker-posts

सेवेतील शिक्षकांची अन्यायी TET परीक्षा सक्ती व अन्यायी पदोन्नती धोरणाविरोधात प्राथमिक शिक्षकांच धरणे आंदोलन



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

धरणे आंदोलनामध्ये TET  CTET उत्तीर्ण पात्रता असूनही सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नती मध्ये डावलण्याने सेवाजेष्ठ शिक्षकांवर होत असलेला अन्याय निवारण व्हावे व सन 2013 पूर्वीच्या सेवेतील शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा घेण्यात यावी या विषयावर घेण्यात आले.
 या आंदोलनात पुढील प्रमुख मागण्याचा समावेश होता.
        
A) सर्वोच्च न्यायालय व शासन पत्राशी विसंगत असलेले मा.संचालक यांचे दि. 14 मे 2026 चे शासनपत्र अधिक्रमित करण्यात यावे.
B) ज्या जिल्ह्यात दि. 14 मे 2026 च्या पत्रानुसार अन्यायकारक पदोन्नती प्रक्रिया झाली आहे ती रद्द करण्यात यावी.
C) दि. 04 जून 2026 च्या शासन पत्राप्रमाणे सन 2025 – 26 या वर्षातील पदोन्नतीसाठीही या महिन्यात होणाऱ्या पदोन्नती समितीच्या (DPC ) दिनांकादिवशीची पात्रता विचारात घेवून सेवाजेष्ठतेने पदोन्नती व्हावी  असे निर्देश शासन स्तरावरून सर्व जिल्हा परिषदनां  व्हावेत ही विनंती.
D) तसेच सन 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांसाठी TET / CTET उत्तीर्णसाठी 40% गुणांची अट करण्यात यावी अथवा तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब या राज्याच्या धर्तीवर इयत्ता 1 ते 8 च्या अभ्यासक्रमावर आधारित सन 2013 पूर्वीच्या शिक्षकांची स्वतंत्र TET परीक्षा घेण्यात यावी ही नम्र विनंती .
E) TET पेपर फु्टीमुळे परीक्षेला बसलेल्या शिक्षकांची मानसिकता बिघडली असल्याने सेवेतील शिक्षकांना उत्तीर्णतेची अट 40 टक्के करावी व पेपर फुटीची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ही नम्र विनंती. ह्या मागण्या करण्यात आल्या, आजचे हे आंदोलन राज्यभर करण्यात आले.
      या मागाण्यां बाबत महाराष्ट्र शासनाकडून लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय व्हावेत ही नम्र विनंती आहे. अन्यथा  भविष्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल याची नोंद घ्यावी. असे आंदोलनात वक्त्यांनी नमूद केले. आंदोलन पुढील टप्पा 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करून करण्यात येणार आहे. आंदोलनातील मागण्या निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले

धरणे आंदोलनाचे नेतृत्व
हरीश ससनकर राज्य सरचिटणीस पुरोगामी शिक्षक समिती 
डॉ अलकाताई ठाकरे महिला राज्याध्यक्ष 
सतीश बावणे जिल्हाध्यक्ष अखिल शिक्षक संघ, विपिन धाबेकर जिलाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना, विजय कुमरे जिलाध्यक्ष अफ्रोट संघटना, गणपत विधाते अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघटना, राजू लांजेकर शिक्षक परिषद, प्रकाश कुमरे पदवीधर संघटना, सुरेश गिलोरकर सरचिटणीस पुरोगामी, पौर्णिमा मेहरकुरे महिला सचिव, सुनील कोहपरे, जीवन भोयर, रवी सोयाम, अरविंद चिडे, सदन मुनगेलवार, मनोज बेले, चांगदेव पाझारे, सुधीर झाडे, संदीप कोंडेकर, अतुल तिवाडे, राजू घोरुडे, गणेश दुधलकर, राजू चौधरी, विलास मोरे, सुलक्षणा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या