गट ग्रामपंचायत कवलेवाडा मधील प्रकार
क्रांतीज्योती महिला संघटनेचा आरोप, दोषींवर बालकामगार कायद्यान्वये कारवाईची मागणी
न्याय न मिळाल्यास निवेदनातून तीव्र आंदोलनाचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
पांलादुर:-लाखणी तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत कवलेवाडा, कवडसी, मेंगापूर, पहाडी, खैरी इत्यादी गावाचा समावेश असून पावसाळामध्ये पाणी नालीने वाहून जाण्याकरिता कवडसी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून ग्रामपंचायत सदस्य व ठेकेदाराने नालीसफाईचे धोकादायक काम करून घेतल्याचा गंभीर आरोप क्रांतीज्योती महिला संघटने केला आहे. अपघातात सदर बालकाचा पायाचा अंगठा कापावा लागल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. याप्रकरणी दोषींवर बालहक्क संरक्षण कायदा 2005 व बालमजुरी प्रतिबंधक कायदा 1986 अंतर्गत कडक कारवाई करावी अशी मागणी संघटने निवेदनाद्वारे केली आहे.क्रांतीज्योती महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी भिवगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मा. जिल्हाधिकारी भंडारा, मा. पोलीस अधीक्षक भंडारा व मा. तहसीलदार लाखनी यांना निवेदन दिले.
निवेदनानुसार, कवडसी येथील इयत्ता 10 वीत शिकणारा दुर्गेश मधुसूदन सार्वे वय 15 हा आपल्या आजी-आजोबांसोबत राहतो. त्याचे आई-वडील नागपूरला मोलमजुरी करतात. मे 2026 मध्ये ग्रामपंचायत सदस्य व नालीसफाई ठेकेदार राजकुमार खंडाईत यांनी दुर्गेशला कामाचे आमिष दाखवून दि. 08 मे 2026 ते 24 मे 2026 पर्यंत नालीसफाईच्या कामावर घेतले. दररोज 350 रुपये मजुरी देण्याचे ठरले होते.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दि. 24 मे 2026 रोजी काम करत असताना ठेकेदाराने दुर्गेशला क्षमतेपेक्षा जास्त वजनाची सिमेंटची फरशी उचलण्यास सांगितली त्यावेळी फरशी दुर्गेशच्या पायावर पडून अपघाती त्याच्या पायाचा अंगठा चेंदामेंदा झाला. सुरुवातीला त्याला पालांदूर येथील डॉ. हजारे यांच्याकडे तात्पुरती उपचार केला.प्रसंगी
डॉक्टरांनी बेजबाबदारपने व थातूरमातूर उपचार केल्याचे निवेदनात स्पष्ट केले असून भंडाऱ्याच्या डॉ. आकरे व शेवटी नागपूरच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. संसर्ग वाढल्याने दि. 02/06/2026 रोजी दुर्गेशच्या पायाचा अंगठा शस्त्रक्रियेने कापावा लागला.या प्रकरणात ठेकेदार राजकुमार खंडाईत, स्वप्निल खंडाईत, सरपंच मनीषा खंडाईत, ग्रामसेवक प्रदीप चेटूले यांनी बालकाकडून काम करून घेऊन त्याच्या अपंगत्वास कारणीभूत ठरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.संघटनेने दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून दुर्गेशला नुकसान भरपाई व पुनर्वसन देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदन देताना अश्विनी भिवगडे, सुमन कानेकर, हर्षा वंजारी, कमल गणवीर, वीणा डोंगरे, साधना शिंगाडे, नलिनी ढवळे, वर्षा हुमणे यांच्यासह क्रांतीज्योती महिला संघटनेच्या सदस्या उपस्थित होत्या प्रसंगी निवेदनातून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा व्यक्त केला.


0 टिप्पण्या