Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी (काकडे) येथील शिवरस्ता मोकळा करा अन्यथा तीव्र आंदोलन!

नायब तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील मौजा आष्टी (काकडे) येथील शेतशिवारातील 70 वर्षांपासूनचा वहिवाटीचा शिवरस्ता बेकायदेशीरपणे बंद केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. नायब तहसीलदारांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कॉम्रेड राजू गैनवार, माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यात भगवान गोसाई मांदाडे, विजय किसन पिदुरकर, प्रवीण शंकर ठाकरे व इतर शेतकरी सह-अर्जदार आहेत.

अर्जदारांच्या आष्टी (काकडे) येथील सर्वे क्र. 176 ते 180 व आष्टी (तुकूम) येथील सर्वे क्र. 80 या शेतजमिनीकडे जाण्यासाठी सर्वे क्र. 133/1, 133/2, 133/3 मधून गेल्या 70 वर्षांपासून 30 फूट रुंदीचा शिवरस्ता वापरात आहे.  
मात्र प्रवीण दादाजी बारतीने व  नामदेव  कानोबा पिदुरकर यांनी कोणताही कायदेशीर अधिकार नसताना या रस्त्यावर तारेचे कुंपण करून रस्ता पूर्ण बंद केला आहे. त्यामुळे शेतीची मशागत, पेरणीची कामे ठप्प झाली आहेत.

याबाबत 23/06/2025 रोजी तहसीलदारांकडे तक्रार दिली होती. स्थळपाहणी व जबाबानंतर नायब तहसीलदार मनोज आकनुरवार यांनी 25/05/2026 रोजी 10 फूट रुंदीचा रस्ता तात्काळ मोकळा करण्याचा आदेश दिला.  
26/05/2026 रोजी तहसीलदार व SDO वरोरा यांनाही निवेदन दिले. मात्र आजपर्यंत आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. आरोप आहे की तलाठी व मंडळ अधिकारी पैसे घेऊन टाळाटाळ करत आहेत.

*कम्युनिस्ट पक्षाच्या या प्रमुख 4 मागण्या:*  
1.  *25/05/2026 च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी* करावी 
2.  *बेकायदेशीर कुंपण हटवून 30 फूट रस्ता कायमस्वरूपी खुला* करावा
3.  *आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई* करावी
4.  *चौकशी करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा*

"सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना म्हणजे प्रशासनाचा अवमान आहे. तात्काळ रस्ता मोकळा न झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीव्र क्रांतिकारी आंदोलन छेडले जाईल" असा इशारा कॉम्रेड राजू गैनवार यांनी दिला. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त यांनाही पाठवण्यात आले आहे.

_____________________________________

⛏️ *शिवरस्ता बंद! शेतकरी आक्रमक*

*भद्रावती आष्टी काकडे - 70 वर्षांचा शिवरस्ता तारेच्या कुंपणाने बंद. नायब तहसीलदारांनी 25 मे ला 10 फूट रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले पण अंमलबजावणी नाही. तलाठी-RI वर आरोप. कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनाचा इशारा. कॉ. राजू गैनवार आक्रमक.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या