Ticker

6/recent/ticker-posts

विनयभंग प्रकरणावर काँग्रेस आक्रमक

भाजप नगरसेवक सूरज पांडे यांचे पद रद्द करण्याची मागणी!

राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर : गडचांदूर नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देऊन निष्पक्ष चौकशी, कठोर कारवाई आणि आरोपीचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद आहे की, संबंधित नगरसेवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत विनयभंग, घरात घुसखोरी, अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काँग्रेसने दावा केला आहे की, संबंधित नगरसेवक यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी प्रकाश निमजे यांना मारहाण करणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले होते.

निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबत सक्षम प्राधिकरणाकडे कार्यवाही करावी, पीडित महिलेला न्याय व आवश्यक संरक्षण द्यावे.
  
निवेदनात म्हटले आहे की, "लोकप्रतिनिधी हा समाजासाठी आदर्श असावा" अशी जनतेची अपेक्षा असते. मात्र सत्ता व पदाचा धाक दाखवून महिलांना धमकावणे, नागरिकांना मारहाण करणे ही बाब गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोणालाही पाठीशी घालता कामा नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.

या निवेदनावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष संजय मेंढी, प्रणिता उपाध्ये, सभापती तुषार बावणे, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, नगरसेवक एजाज अहमद, चेतन शेंडे, शैलेस लोखंडे आदी उपस्थित होते.

_______________________________________

🚨 गडचांदूर नगरसेवक अडचणीत!

भाजप नगरसेवक सूरज पांडे विरुद्ध विनयभंग, धमकीचा गुन्हा. काँग्रेस आक्रमक. जिल्हाधिकारी व SP ना निवेदन. पद रद्द करा, निष्पक्ष चौकशी करा, पीडितेला न्याय द्या अशी मागणी. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या