◾शासकीय औद्योगिक कॉलेज सदस्य आनंद सोनवाने यांची मागणी •
चित्रा न्यूज नेटवर्क / आशिष चेडगे विशेष प्रतिनिधी
◾साकोली १४ जुलै : सुसाट वेगाने पळविणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण कॉलेज रोडवर तातडीने गति अवरोधक बसवा अशी मागणी कॉलेजचे सदस्यगण आनंद सोनवाने यांनी केली आहे.
◾सदर वरील दोन्ही मुख्य महाविद्यालय हे सेंदूरवाफा येथे असून हा मुख्य रोड पाथरी - तुडमापुरी - वडेगाव - खांबा - कोसमतोंडी ते थेट मुरदोली, गोरेगाव व गोंदिया जातो. या रोडवर हे दोन्ही शासकीय व मुख्य कॉलेज असून सतत विद्यार्थ्यांची वर्दळ असते. रोडवर चारचाकी व दुचाकी वाहने काही नियमतोड लोक सुसाट वेगाने पळवितात. दोन दिवसांपूर्वी सुसाट वाहनाने पॉलिटेक्निक कॉलेज मधील विद्यार्थीनी थोडक्यात बचावल्या होत्या असे कॉलेजचे एक अधिकारींनी "प्रतिनिधी" ला सांगितले. या मुख्य मार्गाने कमी किलोमीटर अंतराने गोंदियाला जाणारे भरपूर चारचाकी व दुचाकी वाहने चालतात. तर काही सडकछाप मजनू भरधाव वेगाने दुचाकी चालवून परीसरात येरझारा घालीत फिरतात. अश्या सुसाट वेगाच्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन ते शासकीय आरटीआय पर्यंत गति अवरोधक तातडीने लावण्यात यावे अशी मागणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदस्य आनंद सोनवाने यांनी केली आहे.
♦️काय म्हणाले मागणीकर्ता -
"शासकीय शैक्षणिक महाविद्यालय परीसरात गति अवरोधकची अत्यंत आवश्यकता आहे. जेणेकरून सुसाट वेगाच्या वाहनांवर आळा घातला जाईल. म्हणून येथे लवकरात लवकर गति अवरोधक बसविणे आता अत्यंत महत्त्वाचे झाले आहे"
-- आनंद ई. सोनवाने
"सदस्य" शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय, साकोली सेंदूरवाफा.


0 टिप्पण्या