Ticker

6/recent/ticker-posts

केसलवाडा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पवनी- 0 ते 5 वर्ष वयोगटातील   बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 अंतर्गत तालुक्यातील अड्याळ जवळील केसलवाडा येथील आंगणवाडी केंद्र येथे रविवार (ता.28 जून ) ला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
   लसीकरण केंद्रामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 35 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.यामध्ये 15 बालक आणि 20 बालिकांचा समावेश आहे.पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता आंगणवाडी सेविका माया गजभिये आणि आशा वर्कर पौर्णिमा बारसागडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या