चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात पी.एम.श्री. जिल्हा परिषद हायस्कूल येथील इयत्ता आठवी मधील १३ विद्यार्थी तर ५ वी मधील ७ असे एकूण २० विद्यार्थी विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पी. एम. श्री जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनीमध्ये आर्या भगवान उके, धीया महादेव मानकर, कृतिका गुणीलाल बागडकर, मिताली रमेश लंजे, रुचिता राजेश डोंगरवार, शांतनु नितीन थेर आणि यशस्वी आशुराज चांदेवार या विद्यार्थी विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर आठवीतील विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये बादल विश्वनाथ हेमने, डूनेश्वरी उमेशचंद्र नगरकर, गीता वासुदेव मौजे, हर्षल दिनेश तरोने, हेमंत संजय रुखमोडे, माही भगवान उके, नव्या हरिश्चंद्र मलेवार, पूर्वा चंद्रशेखर कापगते, रोहन रविशंकर समरीत, सुशील उत्तम मेश्राम, स्वप्निल विजय शिवणकर, उत्कर्ष सतीश इटवले, आणि यशस्वी नरेंद्र वलथरे यांचा समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनीनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे, शाळा समितीचे अध्यक्ष मदनभाऊ रामटेके तथा समस्त पदाधिकारी तथा संपूर्ण शिक्षक वृंद पल्लवी शिंदे, लीना हुमने बी.आर.चव्हाण, डॉ. मनोज बागडे कुमुद नाकाडे, अमित डोये, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष हुसन बडोले, श्रीमती चौधरी, मनोहर भैसारे, धनराज मसराम नरेश बाळबुद्धे, सचिदानंद लुटे, नेकराज वजाडे, प्रयाग बोरकर, तोफीक सय्यद, मुकेश गुरनुले, सुशांत बांडेबुचे, इमरान तुरक पायल गणवीर यांना दिलेले आहे.


0 टिप्पण्या