Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पल्स पोलिओ अभियानाचा समारोपीय कार्यक्रम साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दिनांक 28/6/2026 ते 4/7/2026 या कालावधीत पल्स पोलिओ अभियान राबवण्यात आले होते या मोहिमेत पहिल्या दिवशी 21 बूथ वर डोस देण्यात आले तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कॉन्व्हेंट मधील बालकांना जे बालक गृहभेटीच्या वेळी घरी गैरहजर राहिले असते त्यांना कॉन्व्हेंट मध्ये जाऊन पोलिओ डोस पाजण्यात आला व पाच दिवस घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात आले असून यामध्ये अपेक्षित घर संख्या 8599 ही घरोघरी सर्वेक्षण करून पूर्ण करण्यात येऊन त्यामध्ये एकूण 3500 लाभार्थी होते पाचव्या दिवशी शंभर टक्के काम पूर्ण झाले असून ही मोहीम उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली 
             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मोरे अधिपरिचारिका यांनी केले तसेच समारोपीय कार्यक्रम परिसेविका वर्षा  दरोकर यांनी पार पाडला यावेळी रुग्णालयातील कर्मचारी सुजित वानखडे विनय शेलूरे प्रकाश मंगळे प्रशांत बेहरे कल्पना पंधरे पुष्पा पंधरे भारती राऊत अर्चना पवार आशिष नेरकर तसेच श्रीराम कॉलेजचे प्राचार्य राहुल धवड व कॉलेजचे सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या