Ticker

6/recent/ticker-posts

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेर्धात हाळी-हंडरगुळी बंद १००% यशस्वी..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:-​दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी बळाच्या वापराच्या आणि लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून २३ जुलै रोजी राज्यव्यापी 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली होती,म्हणुन आदल्या दिवशी बंद समर्थकांनी मार्केट मध्ये फिरुन बंद बाबत विनंती केली आणि दि.२३ ला हाळी-हंडरगुळीतील जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्रे वगळता अन्य आस्थापने दि.२३ रोजी दु.१ वा.पर्यंत व्यापा-यांनी कडकडीत बंद ठेवले होते. 
​बंद समर्थकांनी सर्वसामान्यांना त्रास न होता, शांततेच्या मार्गाने आणि दडपशाहीविरोधात आपला निषेध नोंदवण्याचे आवाहन केले होते.
आणि याचे सर्वांनी तंतोतंत पालन करुन बंदला १००% पाठींबा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या