Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्र. १ व ७ मधील इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-माजी नगरसेवक धनराज साठवणे यांच्या वतीने प्रभाग क्र. १ व प्रभाग क्र. ७ मधील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी, भंडारा येथील पंचकमिटी हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक कमल साठवणे, पंचकमिटी अध्यक्ष बाळु सेलोकर, तेली समाज पंचकमिटीचे सचिव अशोक निमकर, जीवन कावळे, नरेंद्र मानापुरे, युवराज असोले, दक्ष थोटे, नरेंद्र साकोरे, राधेश्याम देशमुख, पिंटू नागपूरे, दीपक पाटील तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उच्च शिक्षण, कठोर परिश्रम आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी नगरसेवक कमल साठवणे यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत अशा उपक्रमांद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला.

या सत्कार समारंभास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या