Ticker

6/recent/ticker-posts

गांजा वाहतुक करणारा ट्रक ताब्यात

 साकोली पोलिसांची कारवाई

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-आज पहाटे२७ जुलै रोजी ०२.०० ते ०३.०० वा. सुमारास साकोली पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली. त्यानुसार टाटा कंपनीचा ट्रक क्र. W.B. २३ F.८७८५ हा राजनांदगांव कडुन नागपुरकडे जात असता त्यामध्ये भरपुर प्रमाणात गांजा असल्याचे आढळून आले. यावेळी साकोली पोलीसांनी टोलनाका सेंदुरवाफा येथे टाटा कंपनीचा ट्रक क्र. WB २३ F८७८५ ताब्यात घेतला.
चालक पंकजकुमार भुषन यादव ( वय ३० वर्ष ) रा. खुजहटिता मांजी जि. छपरा राज्य बिहार आणि क्लीनर बापी बादल मालीक ( वय ३८) रा. नवग्राम, जमालपुर थाना, जिल्हा. वर्धमान राज्य पंश्चिम बंगाल यांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष कायदेशिररित्या ट्रकची तपासणी केली असता सदर ट्रक मध्ये १९९.५६० किलो ग्रॅम वजनाचा मुभलग प्रमाणात गांजा आढळून आला. त्याची किंमत प्रती किलो ५०,००० रु. प्रमाणे एकुण किं. ९९,७८,००० रू. असल्याची माहिती आहे. साकोली पोलीसांनी आरोपी विरूद्ध पो. स्टे. साकोली अप. क्र. ६०६/२०२६ कलम ८ (क), २० (ब) ii (क) एनडिपिएस अँक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला. सदर गुह्याचा पुढील तपास स.पो.नि. जितेंद्र राऊत करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक भंडारा नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक भंडारा निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापुरे,  साकोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, पो.उप.नि. किशोर मानकर, पो.उप.नि.अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी, पोलीस अंमलदार नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे, गोंविद शिंदे, धनविजय गणविर, पोलीस स्टेशन साकोली यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या