Ticker

6/recent/ticker-posts

साकोली पंचायत समितीचे नवे गट शिक्षणधिकारी कोण?


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली: साकोली पंचायत समिती येथे गत दीड वर्षापासून मोहाडी येथून प्रति नियुक्तीवर आलेले गट शिक्षणधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांना त्यांच्या मोहाडी येथील मुख्य ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्यामुळे साकोली पंचायत समितीचे नवे गट शिक्षणधिकारी कोण ? याची कुजबुज आता शिक्षक वृंदात सुरू झालेली आहे. सविस्तर प्राप्त झालेल्या बातमीनुसार, साकोली पंचायत समिती येथे गट शिक्षणधिकारी म्हणून विजय आदमने हे गेल्या दीड वर्षापासून कार्यरत आहेत. गेल्या दीड वर्षापासून त्यांनी साकोली तालुक्यातील गट शिक्षणधिकारी म्हणून शैक्षणिक धुरा सांभाळलेली होती. त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी चांगला गेला असला तरी बारावी परीक्षेच्या दरम्यान ते एका ऑडिओ क्लिप वरून चर्चेत आलेले होते. या प्रकरणाची चर्चा त्यावेळी तालुक्यात मोठी झालेली होती हे विशेष. दीड वर्षापासून साकोली पंचायत समितीत गट शिक्षणधिकारी म्हणून प्रतिनियुक्त कार्यरत असलेले वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने यांना तातडीने मोहाडी येथे परत पाठविण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्य कार्यपालन अधिकारी मिलिंद साळवे यांनी दिली आहे.  मोहाडी येथे शुक्रवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत विजय आदमने यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ कार्यस्थळी म्हणजे मोहाडी येथे रुजू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षणधिकारी ही महत्त्वाची  पदे रीक्त असल्याने शिक्षण विभागाचा प्रशासकीय कारभार विस्कळीत झाल्याची चर्चा मोहाडी तालुक्यात होती. मोहाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. यावर मुख्य कार्यपालन अधिकारी मिलिंद साळवे यांनी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने यांना मोहाडीत परत पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता साकोली पंचायत समितीचे नवे गट शिक्षणधिकारी कोण ? याची चर्चा आता चांगलीच रंगू लागलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या