( इको-फ्रेंडली फूड टॅबलेट’च्या शोधाने मिळवली राष्ट्रीय ओळख)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा,गोपीवाडा येथील इयत्ता 7 वीचा विद्यार्थी बंटी महेश राघोर्ते ने तयार केलेल्या ‘इको-फ्रेंडली फूड प्रिझर्वेटिव्ह टॅबलेट’ या पर्यावरणपूरक संशोधनाने तालुक्यातून थेट इस्रो, बेंगळुरू पर्यंत मजल मारली आहे.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याने अव्वल स्थान पटकावले. या यशामुळे त्याची निवड *इस्रोच्या ‘अंतराळ संशोधन केंद्र, बेंगळुरू’* येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
दि. 13 ऑगस्ट 2026* रोजी बंटी बेंगळुरू येथे इस्रोच्या शास्त्रज्ञांसमोर आपला प्रयोग सादर करणार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत ‘नाविन्यपूर्ण योजना’ मधून त्याच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाने संपूर्ण खर्च मंजूर केला असून, त्याचा प्रवास नागपूर ते बेंगळुरू विमानाने होणार आहे.
‘पर्यावरणपूरक अन्नाच्या सुरक्षा गोळ्या’ या नावाने बंटी ने नैसर्गिक वनस्पतींपासून अशा गोळ्या तयार केल्या आहेत, ज्यामुळे फळे-भाज्या व इतर अन्नपदार्थ रासायनिक प्रिझर्वेटिव्हशिवाय अधिक काळ ताजे राहू शकतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेणे ही भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
जिल्हा परिषदेच्या ‘नाविन्यपूर्ण योजना’ अंतर्गत अशा बाल-शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच्या या यशाने जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञान क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे.
मा.जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर


0 टिप्पण्या