सत्ताधारी गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; सभागृहात राडा
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेत 'भाजप विरुद्ध भाजप' असा अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला. सत्ताधारी पक्षातील अंतर्गत गटबाजी आता थेट चव्हाट्यावर आली असून, मनपा कार्यालयात नगरसेवकांनी एकमेकांवर भिडण्याची खळबळजनक घटना घडली आहे.
चंद्रपूर मनपाची सर्वसाधारण सभा कुटिल्या नियमांच्या आधारे रद्द करण्यात आली. यावर संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. पहिल्या दिवशी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला.
दोन्ही गट आमने-सामने:
या वादातच आमदार सुधीर मुनगंटीवार गटाचे नगरसेवक आणि आमदार किशोर जोरगेवार गटाचे नगरसेवक समोरासमोर आले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट चकमकीत झाले. दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने मनपा परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंतर्गत धुसफूस इतकी तीव्र होती की वातावरण निवळायला बराच वेळ लागला. या घटनेमुळे चंद्रपूर भाजपमधील सुधीर मुनगंटीवार गट आणि किशोर जोरगेवार गट यांच्यातील सत्तेची सुप्त लढाई आता उघडपणे समोर आली आहे.
_____________________________________
🔥 मनपात भाजपचा भाजपशी राडा!
चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावले. सुधीर मुनगंटीवार गट विरुद्ध किशोर जोरगेवार गट. सभा रद्द झाल्याने आयुक्त कार्यालयात ठिय्या. पोलिसांची मध्यस्थी. भाजपची अंतर्गत गटबाजी उघड.


0 टिप्पण्या