Ticker

6/recent/ticker-posts

डास उत्पत्तिस्थानामध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 मोर्शी- उपजिल्हा रुग्णालय मोर्शी हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकन गुनिया या किटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.
               जैविक उपायोजनेअंतर्गत किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही मोहीम राबविल्या जाते अशी माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात आले.
          ही मोहीम उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक मा डॉ प्रमोद पोतदार, जिल्हा हिवताप अधिकारी मा.डॉ. शरद जोगी, हत्तीरोग अधिकारी मा.डॉ.जुनेद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
    आरोग्य निरीक्षक श्री विनय शेलुरे, प्रकाश मंगळे आरोग्य कर्मचारी प्रशांत बेहरे, संघपाल कांबळे, नंदू थोरात, अक्षय शेवाळे, ऋषिकेश दहेकर, विनोद डहाके यांनी गप्पी मासे धडक मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या