गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 88 हजारांचा मुद्देमाल जप्त
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशनने अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत माजरी कॉलरी परिसरातून गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 122.64 ग्रॅम गांजा, मोपेड, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹88,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2026 रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पंचांसह माजरी कॉलरी परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी MH-34 BY-4057 क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपीटर मोपेडवरून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या समधन सिंग रामसिंग टाक (वय 33, रा. गोकुलनगर, वणी, जि. यवतमाळ) आणि रोशन तेजराम मेश्राम (वय 23, रा. दुर्गापूर, चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता डिक्कीत 122.64 ग्रॅम गांजा आढळून आला. टीव्हीएस ज्युपीटर मोपेड - ₹75,000, विवो कंपनीचा मोबाईल - ₹10,000, रोख रक्कम - ₹250 एकूण मुद्देमाल: ₹88,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी हा गांजा उषादेवी शिवशंकर वर्मा (वय 45, रा. बांधा दफाई, माजरी कॉलरी) हिच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी माजरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 132/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(C), 20(B) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकर आणि उपविभागीय अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली API सुबोध वंजारी व माजरी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
__________________________________
🚔 माजरीत गांजा टोळी गजाआड!
माजरी कॉलरीत पोलिसांची कारवाई. 122 ग्रॅम गांजा, मोपेड,मोबाईल = 88,950 चा मुद्देमाल जप्त. समधन टाक व रोशन मेश्राम अटक. उषादेवी वर्मा नावाची महिला पुरवठादार फरार. NDPS नुसार गुन्हा दाखल. SP आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात कारवाई


0 टिप्पण्या