Ticker

6/recent/ticker-posts

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, सोलापूर यांचे जाहीर आवाहन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, सोलापूर यांच्या वतीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सोलापूर येथून जिल्हा परिषद, पूनम गेट, सोलापूर येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे त्यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा पार पडणार आहे.

या महामोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिक, माता-भगिनी, युवक-युवती तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सोलापूर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आरक्षणाच्या संरक्षणासाठी, संविधानाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या समर्थनार्थ एकजुटीचे दर्शन घडविण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे समितीने म्हटले आहे.

सर्व नागरिकांनी कोणतेही कारण न देता या महामोर्चात सहभागी होऊन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपली एकजूट व्यक्त करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या