सोसायटीत विवेक सुकणेसरांच्या पॅनलनी रचला इतिहास.
———————————
चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :-उदगीर तालुक्यातील मौजे सुकणी सेवा सोसायटीची निवडणुक म्हंटल की,विठ्ठलराव मुळे मामांचे पॅनल *"फिक्स"* असा गत ३०,३५ वर्षापासूनचा अनुभव होता.पण दि.२६ जुलै ला अत्यंत शांततेत संपन्न झालेल्या मतदानात यंदा माञ,मतदारांनी "न भुतो.. असा चमत्कार घडवला आणि गत ३०,३५ वर्षापासून एकहाती राज्य गाजवलेल्या मा.चेअरमन विठ्ठलराव मुळे मामांच्या सत्तेला यंदा ब्रेक लावला आणि विवेक सुकणे सरांचे पॅनलला विजयी गुलाल लावला.आणि सुकणीकर शेतकरी मतदारबंधू व भगीणींनी राजकिय इतिहास घडवला.
बहाद्दर व हुशार असलेला मतदारवर्ग प्रत्येक उमेदवाराला "मी,तुमचाच..!" असे म्हणुन "हॅप्पी" ठेवत होता.म्हणुन दि.२६ रोजी झालेल्या निवडणुकीत निकाल लागे पर्यंत अनेकांचे "दिल धक,धक" करत होते.हे विशेष..!
गत ८ दिवसापासून दोन्ही पॅनलकडून डोअर2डोअर अन् सोशल मीडियावरही प्रचाराचा धुमधडाका लावला तसेच वाहनांवर भोंगे लावून प्रचाराची राळ उडवली होती.विशेष म्हणजे एकमेकांचे स्नेही व नातलगच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटल्याने मतदार माञ ताकास तुर लागू देत नव्हते म्हणुन अगदी शेवटपर्यंत कोण जिंकणार?याची खाञी कुणीही देत नव्हते,आणि झाले ही तसेच कारण या निवडणुकीत अनेकांचा जय-पराजय हा फक्त ४,२ मतांच्या फरकांनीच झाल्याचे उघड झाले. यामुळे यंदा ही निवडणुक किती अटीतटीची झाली याचा अंदाज येतो.
विरोधी पॅनल प्रमुख विवेक सुकणे व सहकारी ''अभी नही तो कभी नही'' ही खुणगाठ मनाशी बांधून सत्तेत आल्यास मतदार बंधू-भगीणींसाठी काय,
काय करणार?याचा लेखा जोखा उत्तमरित्या मांडला आणि तो मतदारांना पटला म्हणुन मतदारांनी इतिहास घडविला.अशी कुजबूज मतमोजणीनंतर होती.
यावेळी विजयी उमेदवार व सहका-यांनी विविध मंदीरात श्रीफळ फोडून देवी,देवतांचे आर्शिवाद घेतले.तसेच फटाक्यांसह गुलालाची ही उधळण केली.जनतेनी विजयी विरांचा सत्कार केला.
पो.उप.निरीक्षक प्रवीणजी हालसे,हेकाॅ.संजय पा. दळवे,हेकाॅ.शिवाजी केंद्रे, पोकाॅ.शेख,कार्लेवाड, नागरगोजे,जिंकलवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मतदारांनी टाकलेला विश्वास आणि केलेला बदल विकासाद्वारे सार्थ करुन दाखविणार आहे.
आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे मन:पुर्वक आभार मानतो.
असे विजयी गटाचे प्रमूख तथा भावी चेअरमन विवेक सुकणे सर म्हणाले.


0 टिप्पण्या