Ticker

6/recent/ticker-posts

स्मार्ट मीटर विरोधात भद्रावतीत भाकपाचे भव्य धरणे आंदोलन संपन्न

"स्मार्ट मीटरचा निर्णय तातडीने मागे घ्या" - भाकपची मागणी

 प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भद्रावती येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. 

दुपारी 1 ते 4 या वेळेत एम.एस.ई.बी. भद्रावती उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सहसचिव व माजी नगरसेवक कॉम्रेड राजू गैनवार यांनी केले.

वीज ही सर्वसामान्यांची मूलभूत गरज आहे. मात्र स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मोठी वाढ होणार असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. राज्य सरकारने ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा प्रकार अन्यायकारक असून वीज ग्राहकांची आर्थिक लूट आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनानंतर उपकार्यकारी अभियंता चंदन इंदुबेला, उदयकुमार चौरसिया यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 *निवेदनातील प्रमुख मागण्या:*
1.  *महावितरणने स्मार्ट मीटर लावणे तातडीने बंद करावे*
2.  *वीज दरवाढ रद्द करावी* 
3.  *लावले स्मार्ट मीटर त्वरित काढण्यात यावेत*
4.  *नवीन वीज जोडणीसाठी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये*
5.  *घरगुती व शेतकरी ग्राहकांना सामान्य मीटरद्वारेच तात्काळ वीज जोडणी करुन द्यावी.*

या मागण्यांच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, अधीक्षक अभियंता चंद्रपूर, कार्यकारी अभियंता वरोरा यांना उपकार्यकारी अभियंता भद्रावती यांच्या मार्फत पाठवण्यात आल्या.

आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
यावेळी कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन, कॉम्रेड दिलीप वनकर, कॉम्रेड शेख शकील, कॉम्रेड सुनील रामटेके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या