(कामगार कल्याण केंद्र येथे लाचा प्रशिक्षण शिबीरचे उद्घाटन)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, भंडारा येथे दिनांक :- २७/०७/२०२७ रोजी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमा अंतर्गत "विविध प्रकारचे लाचा वर्क्स शिवण प्रशिक्षण शिबीर " कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व ग्रीन हेरिटेज चे संस्थापक सईद शेख होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्र संचालक श्री सचिन रोडगे,प्रशिक्षिका सौ.चंदा प्रकाश मुरकुटे ह्या उपस्थित होत्या. प्रशिसावित्रीबाई फुले यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पाहुण्यांचे हस्ते द्विप प्रज्वलीत करण्यात आले. नंतर पाहुण्यांचे परिचय करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मोहंमद सईद शेख यांनी कार्यक्रमा विषयी मार्गदर्शन करतांना "महिलांनी अबला नाही,सबला बनून अशा प्रशिक्षणातून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून आपली प्रगती साध्य करावी"असे प्रतिपादन केले.तसेच कार्यक्रमाच्या प्रशिक्षिका मा. सौ. चंदा मुरकुटे यांनी सुद्धा महिला प्रशिक्षणार्थी ना मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संचालक श्री. सचिन रोडगे यांनी मंडळचे कार्यक्रम उपक्रम व योजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे संचालक केंद्र उपसंचालिका सौ. संगीता नागमोते यांनी
तर आभार प्रदर्शन ग्रंथापाल सौ.मंदा सेलोकर यांनी केले. कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता शिशु मंदिर आया सौ.उषा मेश्राम यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या