Ticker

6/recent/ticker-posts

" रेड क्रॉस भंडारा द्वारा आयोजित कौशल्य उद्योजकता शिबिरात महिलांचा सत्कार सोहळा "


( रेड क्रॉस संस्था व दिलासा ग्रुप द्वारा गुरु पौर्णिमेनिमित्त महिलांचा सत्कार सोहळा)

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :- कृषी विज्ञान केंद्र साकोली, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, स्व. डॉ. तुरसकर फाउंडेशन च्या वतीने कौशल्य उद्योजक्ता प्रशिक्षण शिबिर रेड क्रॉस मुख्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आले.
      अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र साकोली च्या संशोधक व प्रमुख डॉ. उषा डोंगरवार  होत्या. अतिथी म्हणून डॉक्टर अशोकराव ब्राह्मणकर चेअरमन, डॉ. नितीन तूरसकर सचिव,मो. सईद शेख इतिहासकार, राजू सलाम भाई पटेल समाजसेवक,सुधीर पडोळे टाऊन वेंडिंग कमिटी नगरपरिषद, श्री. लाडे अधीक्षक भारतीय पोस्ट इत्यादी होते.
         महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करता यावे याकरिता इंडियन रेडक्रॉस सोसायटी, स्वर्गीय डॉ. देवेंद्र तुरसकर,स्व. डॉ. सीमा तुरसकर फाउंडेशन व  कृषी विज्ञान केंद्र साकोलीच्या संयुक्त विद्यमाने" *लिंबू* *आचार शास्त्रीय पद्धतीने कसे* *बनवावे? व त्याची बाजारपेठ कशी* *निर्माण करावी?यासंदर्भात* डॉ. उषा डोंगरवार वैज्ञानिक व प्रमुख केवीके साकोली  यांनी आपले विचार मांडले. यात संपूर्ण भंडारा जिल्ह्यासह नागपूर अमरावती येथील 70 महिलांनी भाग घेतला.
        कौशल्य विकास शिबिरात फळ व भाजीपाला मूल्यांकन विभागाच्या *कांचन तायडे यांनी लिंबूचे आजार* *यासंदर्भात शास्त्रोक्त* *पद्धतीने बनवण्याची पद्धत,स्वादिष्ट व* *टिकाऊ कसे* *बनवता येईल याचे प्रात्यक्षिक करून* *दाखविले.* 
        प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिलांचा  इंडियन रेड क्रॉस सोसायटी व दिलासा ग्रुपच्या वतीने गुरु पौर्णिमेचे अवचित साधून सर्वांचे पुष्पकळी देऊन सत्कार करण्यात आले. 
        प्रशिक्षण शिबिरात संशोधक व शिबिराचे अध्यक्ष  डॉ.उषा डोंगरवार, अतिथी डॉक्टर अशोकराव ब्राह्मणकर चेअरमन, डॉ. नितीन तुरसकर सचिव रेड क्रॉस भंडारा,डॉ. स्नेहा तुरसकर, इतिहासकार मोहम्मद सईद शेख,सुधीर पडोळे,  श्री लाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रस्ताविक -हेमंत चंदवासकर कोषाध्यक्ष, सूत्रसंचालन- राजू खवसकर साहित्यिक, आभार- मीरा भट्ट ज्येष्ठ महिला सदस्य यांनी केले.
         कौशल्य उद्योजकता  विकास शिबिरास *भंडारा, नागपूर, अमरावती* येथील महिला दिपाली पडोळे, नम्रता बागडे, वंदना तुरसकर, जयश्री तुरसकार, पद्मा खवसकर, सुषमा घुबडे, संगीता डहाके, अर्चना सपाटे, आंचल मेश्राम,सुनिता चौधरी, मीरा भट्ट,संध्या बोंद्रे, रोहिणी माणूसमोरे, दुर्गा गोल्ल्लर, भुवनेश्वरी तुमसरे, दामिनी कनोजे, सुरेखा शेंडे,आशा चकोले,सुनंदा सावरकर, सुनीता   बारापात्रे,भुवनेश्वरी नागपुरे,कविता बुलबुले, वर्षा बुलबुले,कल्पना चव्हाण, ममता झाडे,दिपाली चंदवासकर,शालिनी खोत, कोमल साखरकर, संगीता  कळंबे, वृषाली कलंबे,करूणा राऊत, शाहीणा खान, कल्पना चव्हाण, लीना तुरसकर, जयश्री तुरसकर, सुनंदा कुंभलकर, जयश्री नंदुरकर,शिला सेलोकर, अनिता देशपांडे, सोनू मंढरे, लता वंजारी, छाया खोब्रागडे, कविता मोहतुरे, कैसर सैय्यद, अल्का मरस्कोल्हे, सोनाली तुरसकर, सुनीता गेडाम, सुरक्षा धरमसारे, भाग्यश्री कासीकर, करुणा राऊत, सीमा काळे इ. महिलांनी सहभाग घेतला.
          कार्यक्रम यशस्वीतेकरिता हेमंत चांदवसकर,राजू खवसकर,मीरा भट्ट, हिंदूजी वंजारी, संगीता डहाके, अमोल माणूसमारे,रवीसंकर साकोरे, डॉ.स्नेहा तुरसकर,डॉ.नितीन तुरसकर,नम्रता बागडे, डॉ. रुद्रसेन भजनकर,योगेश गडरीये, राजू सुपारे, उमेद दामया,अमित बोंद्रे,मोहित सार्वे,अभिषेक धुर्वे,गौरव बांडेबूचे, पियुष चंदवासकर,गजेंद्र लोढा, कृष्णराव कुकुडकर,अभीविलास घुबडे इत्यादी रेड क्रॉस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

प्रेषक:राजू ख़वसकर,साहित्यिक,पदाधिकारी व इंडियन रेड क्रॉस सोसाइटी,भंडारा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या