Ticker

6/recent/ticker-posts

वीरूर पोलिसांची गौतस्करीविरुद्ध धडक कारवाई

 आर्वी फाट्यावर ₹2.60 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींना अटक


प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर: गौतस्करीला आळा घालण्यासाठी वीरूर पोलिसांनी काल आर्वी फाटा येथे मोठी कारवाई केली. विना क्रमांकाच्या बजाज अपे गाडीतून तेलंगणाला नेण्यात येणाऱ्या ₹60 हजार किमतीचे 2 गोरे आणि 1 कालवडासह ₹2.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना अटक करण्यात आली.

ही कारवाई दिनांक 30/07/2026 रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारे करण्यात आली
ठाणेदार श्री गायकवाड आणि PSI सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हर्षल लांडे बक्कल क्र. 213, अविनाश बोरुले बक्कल क्र. 1319 आणि ठाणेदारांचे राइटर राहुल वैद्य हे साना क्र. 23/26 ने रात्री पेट्रोलिंग करत होते.

यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आर्वी फाटा मार्गाने विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची बजाज अपे गाडीमध्ये जनावरे कोंबून तेलंगणात नेली जात आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्वी फाटा रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान आर्वीकडून येणारी संशयित अपे गाडी थांबवून तपासणी केली असता चालक मोहम्मद साजिद मोहम्मद जावेद वय 24 वर्ष, रा. शिरपूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा आणि सोबत असलेला शेख सईद शेख अब्दुल्ला वय 41 वर्ष, रा. शिरपूर, जि. आसिफाबाद हे आढळले.

गाडीच्या मागील डाल्यामध्ये लाख्या रंगाचे 2 गोरे आणि धामण्या रंगाची 1 कालवड अत्यंत दाटीवाटीने,चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कोंबून ठेवलेली आढळली.
गोवंशीय जनावर 2 गोरे व 1 कालवड, किंमत ₹60,000 बजाज अपे गाडी - किंमत ₹2,00,000 एकूण  ₹2,60,000

चौकशीत आरोपींनी आर्वी येथून जनावरे लोड करून शिरपूर येथे कतलीसाठी विकण्यास नेत असल्याचे सांगितले. वाहनाची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती.

या प्रकरणी वीरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

_____________________________

वीरूर पोलिसांची गौतस्करीवर कारवाई

आर्वी फाट्यावर नाकाबंदीत विना क्रमांकाच्या अपे गाडीतून 2 गोरे व 1 कालवड जप्त. ₹2.60 लाखांचा मुद्देमाल, 2 आरोपी अटक. जनावरे कतलीसाठी तेलंगणाला नेत असल्याची माहिती. ठाणेदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कारवाई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या