Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष लागवड व संगोपन चळवळ गतिमान होणे काळाची गरज : डॉ. सोमनाथ यादव

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अतनूर :-हजारो वर्षापासून पृथ्वीवरील वाढलेली जंगले माणसाने केवळ गेल्या एका शतकात उध्वस्त केली. त्यामुळे परिस्थिती एवढी मोडकळीस आली. याचा परिणाम प्राणी आणि मानवी जीवनावर झाला. सद्य:स्थितीत त्यामुळे जगात कुठे उष्णतेची लाट, कुठे भूकंप, तर कुठे ज्वालामुखीचा प्रकोप होतो आहे. या बदलाचा परिणाम वनस्पतीवर अधिक झाला असून काळाच्या ओघात बऱ्याच वनस्पती नामशेष होत आले आहेत. राहिलेल्या वनस्पतीमध्ये पृथ्वीचे नंदनवन करण्याची प्रचंड शक्ती आहे, त्यामध्ये वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या विस्ताराच्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली नाही तर आज निर्माण झालेले विविध आजार याचाही माणसांना मनस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही, वनस्पती हाच तर प्राणीमात्राचा प्रमुख जीवनस्त्रोत आहे. त्यामुळे वृक्ष चळवळ अधिक किमान करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ सोमनाथ यादव यांनी केले.
जळकोट तालुक्यातील अतनूर येथे जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था समिती महाराष्ट्र राज्य व साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर या संस्थेच्या वतीने दि.२८ जुलै मंगळवार रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने मौजे अतनूर येथे नुकतेच डॉ.सोमनाथ यादव यांच्या हस्ते राज्य मार्ग क्रमांक २६८, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रात व अतनूर-गव्हाण राज्य मार्ग क्रमांक २६८ दुतर्फा मार्गावरील आजूबाजूला व शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड, वृक्षारोपण व संगोपनासाठी व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. पुढे बोलताना ते म्हणाले, आधुनिक काळात निर्माण झालेल्या विविध प्रश्नामध्ये वाढते तापमान, हवेचे प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांना भविष्यात सगळ्याच प्राणीमात्रांना सामोरे जावे लागेल यासाठीही वृक्ष लागवड आणि जोपासन ही उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी मुख्य संयोजक वृक्षमित्र चळवळीचे समाजसेवक तथा दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, हिप्पळनारीच्या सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे, संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत शिंदे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे, माजी सैनिक शिवाजी कदम, गुरुनाथ कापसे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोडरूळ, संस्थेचे गणेश कोडरूळ, व इतर नागरिक, संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या