चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर : जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त आज श्री. हावगीस्वामी महाविद्यालय व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय ,उदगीर, कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उदगीर येथे प्राध्यापकांना शुभेच्छा कार्ड देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्याला योग्य दिशा दाखवणारे अनेक गुरु असतात, बालपणापासून ते आपण जिथे कामाला लागतो तिथपर्यंत अगदीच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक लोक असतात, त्यातील काही लोकांना आपण मनापासून गुरु मानतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु विषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरु दक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हेच महत्व लक्षात घेता जीवन प्रयाग फाऊंडेशनने हा शुभेच्छा कार्यक्रम राबवला. यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, क्षितिज जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या