Ticker

6/recent/ticker-posts

साकोली पोलीस विभागाचे शाळांना प्रभावशाली मार्गदर्शन


 शाळा प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे जंगी स्वागत 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-हायटेक भरारी घेतलेली जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १. गणेशवार्ड साकोली येथील मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशद्वारावर चिमुकलांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी साकोली पोलिस विभागाकडून  विद्यार्थ्यांना उपयुक्त व प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. हेमपुष्ण कापगते, साकोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष देवश्री कापगते, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष डॉ. नरेश कापगते, शाळा समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवाराम  तिडके, माजी विद्यार्थी संघ सदस्य सेवानिवृत्त न्यायालय अधीक्षक वामन कापगते, अँड.दिलीप कातोरे, पोलीस नायक राहुल गायधने, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष जगन उईके, पंचायत समिती गट साधनचे वैशाली नगराळे, मुख्याध्यापक सेवकराम हटवार, माजी विद्यार्थी कुंदन वलके, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी विजय कापगते, उपाध्यक्ष हिमा राऊत, शाळा समिती सदस्य आशिष चेडगे, भागवत लांजेवार, पुनम मेश्राम, शिशुपाल कराडे, वैशाली कापगते, दिपाली राऊत, दिलीप झोडे, किशोर बावणे, अनिता लांजेवार, प्रशांत इलमकर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मुख्य शहरातून रॅली काढण्यात आली. प्रवेशद्वारावर सर्व मुलांना औक्षण करून गुलाब पुष्प देत अभूतपूर्व व जल्लोष  करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे अतिथींकडून वितरण केले गेले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सेवकराम हटवार, संचालन शिक्षक तुळशीदास पटले आभार शिक्षक डी.आर. माहुरे यांनी मानले. येथे विद्यार्थी स्वागत सेल्फी पॉईंट उपक्रम शिक्षिका शालीन राऊत यांनी राबविला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक वृंद चित्रारेखा इंगळे, श्रद्धा गवळी, सुनीता गहाणे, पदवीधर शिक्षक चेतन बोरकर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या