सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच भव्य रक्तदान शिबिर घेऊन 87 रक्त दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत,सामाजिक कार्यकर्ते अभी मिसाळ,विशाल पवार,ग्रामपंचायत सदस्य दादा जावळे इत्यादींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नीता इंगळे व उपस्थित मान्यवरांनी झेंडावंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी केले.सूत्र संचालन भीमा घोडेराव यांनी केले.राजपूत साहेब यांनी जयंतीनिमित मार्गदर्शन केले.
यावेळी सुरभी ब्लड सेंटर अहिल्या नगर व जामखेड ब्लड स्टोरेज जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर श्री विकास जरे व सहकारी यांच्या वतीने स्वर्गीय लखन मिसाळ यांचे स्मरणार्थ घेण्यात आले.तसेच समाजातील दिवंगत अमोल मोरे,मार्केट कमिटीचे संचालक वैजीनाथ पाटील यांचे वडील कै.पोपट लोंढे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे खर्डा शहर अध्यक्ष गणेश भाऊ जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तसेच यादिवशी वृक्षा रोपण व शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के, विलास जाधव, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स चे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे ,अभी मिसाळ , युवा ढावरे, ग्रामपंचायत सदस्य.मदन पाटिल, ग्रामपंचायत सदस्य,दिपक जावळे. सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव, अखिलेश शिंदे,अलीशेर कुरेशी,विशाल पवार,जितेंद्र पगारे, शंकर गायकवाड, लखण जाधव, दादा मोरे, समाधान जाधव, अंकुश डाडर, आतिश जाधव, किरण गायकवाड,नितीन आहेर, कृष्णा आलाट, कृष्णा थोरात,प्रवीण सदाफुले,अजय जाधव,आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या